हो म्हणू नको

फुलासारख्या ओठांना तू व्यर्थ ठरवू नको
नसेल जन्माची जर सोबत हो म्हणू नको

माझ्या संध्येच्या डोळ्यातील तेज चोरू नको
दिवा जिथे लावितो त्यास तू फुंकर घालू नको

झळकून येते ऱ्हदय - वेदना चेहऱ्यावरी तुझ्या ग
उगा लपवुनी  प्रीतीची या चर्चा घडवू  नको

हे तर जीवन गजबजलेले थडगे मुळीच नाही
एकांताचा विचार सुद्धा येथे करू नको


 (अनुवादित - तू अपने फूल से होटों को रायगां मत कर)