कुत्रेकुई, पळता भुई, झोप जाई!!

एका बातमीनुसार हायकोर्टाने म्हटल्याचे आठवते की झोप हा माणसाचा मूलभूत हक्क आहे.
म्हणून रात्री दहा नंतर लाऊडस्पीकर वाजवण्यावर बंदी केली आहे.
पण, रस्तोरस्ती भटकणाऱ्या कुत्र्यांबद्दल कोर्टाची आणि महानगरपालिकांची भूमिका काय आहे?
रात्री कामावरून घरी परत येणाऱ्या नागरिकांना, लहान मुलांना चावणे, त्यांचेवर भुंकणे, त्यांच्या वाहनामागे पळणे, तसेच रात्रभर कुत्र्यांचा घोळका एकत्र येऊन कर्कश आवाजात मोठ्याने भुंकणे असे प्रकार अनेक शहरातील वेगवेगळ्या परिसरात वाढले आहेत.
त्यामुळे नागरिकांची झोप हैराण झाली आहे.
या भटक्या कुत्र्यांना काही गेटच्या आत राहून भुंकणारी पाळीव कुत्रीही साथ देत असतात.
पाळीव कुत्र्यांचे मालक कुत्र्यांना बाहेरच्या गेटजवळ बांधून स्वतः गाढ झोपतात आणि ती कुत्री इतर लोकांवर भुंकून त्यांची रात्र खराब करतात.
तसेच पाळीव कुत्र्यांचे सुशिक्षित मालक त्यांना सकाळी रस्त्यावर फिरायला नेतात आणि त्यामुळे कुत्रे रस्ते खराब करतात.
त्यांना सामाजिक जाणीव का नाही?
प्राणी दया एवढी महत्त्वाची आहे काय की त्यापुढे एखाद्या नागरिकाचा प्राण, रोजची रात्रीची झोप आणि शहरांची स्वच्छता सुद्धा महत्त्वाची नाही???
या संदर्भात तक्रार करावयाची असल्यास कोठे करता येईल?
कुणाला माहीत असल्यास कळवावे.