पहिले प्रेम

प्रेम ही गोष्ट अशी आहे की एकदा का मनात भरली की ती विसरू शकत नाही. मग ती गोष्ट काहीही असो एखादे शहर असो, रंग असो किंवा एखादी आठवण नाहीतर गाणे... अगदी काहीही ! पहिले प्रेम हे काही निराळेच. आपल्याला बरेच काही आवडते, मनातही भरते पण त्याला पहिल्या प्रेमाची सर येत नाही! ... तर तुमचे पहिले प्रेम कोणते? ते तर सांगाच, पण ते प्रेम का जडले, कुठे आणि कसे तेही सांगा...

मी सांगते... माझे पहिले प्रेम म्हणजे पुणे शहर. पुण्याला विसरणे शक्य नाही. कारण की पूर्वी पुण्यात शाळा कॉलेजमध्ये असताना पुण्यातील बऱ्याच टेकड्यांवर फिरलेली आहे. शुद्ध मोकळी हवा.. शिवाय पुण्यात कोणत्याही रस्त्यावरून चालले तरी खूप मजा येते. अजून खूप गोष्टी पहिल्या प्रेमाच्या आहेत... पण तुम्ही लिहा आधी मग मी लिहिते.