कोडे ओळखा

हाक माझ्या अंतरीची एक, माझ्या दशेवर नको जाऊस
जरा माझ्याकडे बघ, जगाकडे नको लक्ष देऊस

तुझ्या एका कटाक्षासाठी, जगण्याची धडपड आहे
रुसू नकोस पाहिल्यासारखे प्रेम कर
प्रेम निखळ आहे त्यांवर नको आळ घेऊस... जरा...

माणसावर कधी अशीही वेळ येते
त्याला त्याची सावली पण सोडून जाते
कधीतरी उजाडेल, निशेची भीती नको घेऊस... जरा...

मी एक सत्य आहे, हे एक दिवस तुला कळेल
निष्पाप प्रेम केले, एक दिवस तुला रडू येएल
हृदयिच्या कळा अश्या थांबत नाहीत
तू पण त्या नको थांबवूस, जरा......

(मी केलेले एका गाण्याचे भाषांतर...पहिलाच प्रयत्न आहे. चू.भू.देणे/घेणे )

राजेंद्र देवी