आयडीया ३जी सेवा तक्रार - सल्ला हवाय

मी काही दिवसांपूर्वी आयडिया ची ३जी सेवा (८५० रुपये मासिक शुल्क आणि ३ जीबी वापर मर्यादा) ऍक्टिवेट करण्यासाठी विनंती केली.दुसऱ्या दिवशी कस्टमर केअर एक्झिकेटिव्ह ने मला ती सेवा ऍक्टिवेट झाल्याचे सांगितले आणि मी इंटरनेट वापरायला सुरुवात केली. परंतू तिसऱ्याच दिवशी मला '३७०० रुपये बिल झाले' असा एसेमस आला!
मी आजपर्यंत अनेकदा आयडिया कस्टमर केयर ला तक्रार केली पण ते 'आमची काही चूक नाही. तुम्ही गुपचुप बिल भरा' असे सांगतात. कालच मला '१५ दिवसांत बिल भरा नाहीतर लीगल कारवाही करू असा ई-मेल आलाय.
आयडिया च्या 'नोडल ऑफिसर' ला पाठवलेला ई-मेल 'बाऊन्स' होतो आणि संकेतस्थळावर त्यांचा दिलेला नंबर लागत नाही.

कुणाला असा प्रॉब्लेम आलाय का आधी? मी कुणाकडे दाद मागायला हवी?

(मराठी संकेत्स्थळवरचे हे माझे पहिलेच लेखन आहे त्यामुळे चू. भु. द्या. घ्या. )