(व्यर्थ आहे ठेवणे)

एक नवे गंभीर विडंबन:

आमची प्रेरणा जयंतरावांची  एक नवी गंभीर गझल 

व्यर्थ आहे ठेवणे ह्या "केशवा"वरती पहारा
पाडतो कविता हजारो, एकटा तो पाडणारा

भेटल्यावर चौकशी करतोस वजनाची कशाला?
दोन केजी तो कमी बघ सांगतो मग सांगणारा!

बाप अन आई वगैरे सोबती असले कुणी तर
मित्र तेंव्हा व्हायचे मग मी 'दुरूनी हासणारा! '

वाचतो उर्दूप्रमाणे मेनुकार्डाला कशाला..
डिश उंची मागवे तो फुकट पार्टी काढणारा

व्यर्थ सुजतो गाल माझा शेवटी होते असे की
बाप निघतो तो तिचा मज घरगडी जो वाटणारा

--- केशवसुमार