उरला न कविता

आमची प्रेरणा जयंतरावांची सुरेख गझल  उरला न कोणी
उरला न कविता तोडणारा
जोषात ओळी जोडणारा
पाडा तुम्ही कविता कधीही
तैयार आहे 'खोड'णारा
फुटतील अता  कविता अजूनी
आला पुन्हा तो फोडणारा
टंकू नका, आता कुणी ही
"केश्या"न कोणा सोडणारा
हा आपला इतिहास आहे
तू टंकता मी मोडणारा
(केशवसुमार)