भोगले सर्वस्व शेवट वृद्ध झाला

आमची प्रेरणा मिलिंद फणसेंची अप्रतिम गझल  त्यागले सर्वस्व अन्‌ समृद्ध झाला

सोडुनी घरदार "केश्या" बुद्ध झाला ?
भोगले सर्वस्व शेवट वृद्ध झाला
हरकती, मुरक्या प्रियेच्या, कान किटले
(कंठ गाताना कधी ना रुद्ध झाला)
बारली नवसागराचा घोळ केला
झाळला पिंपात मग तो, 'शुद्ध' झाला
ते विडंबन वाचुनी करतात चर्चा
बाप "केश्या"वर तिचा का क्रुद्ध झाला 
दात अक्रोडामुळे ना हालला हा
पण तुझ्या चकल्यांपुढे,   हतबुद्ध झाला 
फाडले प्रत्येक कवितेला, सरावे
केशवाचा का कधी अनिरुद्ध झाला