रताळ्याची खीर

  • रताळी २
  • दूध, साखर
  • वेलची पूड
१५ मिनिटे
२ जणांना

२ रताळी कूकरमधे उकडून घ्यावीत, २-३ शिट्या जास्ती कराव्यात, म्हणजे जास्ती शिजतील.

रताळ्यांची साले काढून त्याच्या खूप बारीक फोडी कराव्यात. ह्या फोडी पूर्णपणे भिजतील इतके दूध घालावे. चवीप्रमाणे साखर घालावी. थोडी वेलची पूड घालावी. हे सर्व मिश्रण ३-४ तार मूरु द्यावे. नंतर ही खीर शीतकपाटात ठेवावी. उपवासाचा फराळ केल्यावर नंतर खावी. शीतकपाटात ठेवल्यामुळे ही खीर जास्ती मुरते आणि दाट होते व चवीला चांगली लागते. खीर पातळ हवी असल्यास त्याप्रमाणात दूध घालावे.

दूसरा एक गोड प्रकारः राजगिऱ्याचा लाडू वाटीमधे ठेवून त्यावर खूप गरम  झालेले दूध हळूहळू ओतावे, त्यामुळे राजगिऱ्याचा लाडू फुटून दुधामधे  विरघळतो. ही झाली झटपट राजगिऱ्याची खीर. बाजारात राजगिऱ्याचे लाडू मिळतात.

रोहिणी

नाहीत.

सौ आई