आधुनिक वाल्मीकी

गेल्या दोन महिन्यात मी अनुभवलेले हे प्रसंग आहेत. व्यक्तिगत कोणाची बदनामी करण्याचा माझा उद्देश्य नाही. वाल्या कोळी वाल्मीकी झाला पण अधुिनक वाल्मीकी त्याची परंपरा न विसरणारा व त्या परंपरेचा अभिमान बाळगणाराच मला दिसला.

गुगल चित्र

दुपारच्या शांततेत ट्रकच्या आदळ आपट आवाजाने मी  बाहेर आलो, सातव्या माळ्यावर नवीन भाडेकरू ट्रक मधून सामान उतरवण्याचा प्रयत्न करत होता काही टगे त्याचा विरोध करत होते. थोड्याच वेळात असाच अनुभव असणारे पुढे सरसावले, मी "बघे" मंडळीत सामील झालो. मला जे समजले तो प्रकार थोडक्यात असा होता.......

नवीन भाडेकरूने थोडे सामान ट्रक मधून बाहेर काढल्या नंतर एक दुचाकी स्वार समोर आला व त्याने सामान बाहेर काढण्याचे किंवा वर नेण्याचे थांबवले होते, ५००० दिले तरच सामान वर जाणार होते. पण सामान हालवण्यात मदत न करता पैसे लाटण्याचा हा प्रकार होता. बरीच शिवीगाळ झाली, टग्याने तोंड वाकडे करत ५०० खिशात टाकले. मला चूप बसवेना " काय हो तुम्ही पवार की माने? " टग्याला त्या हिंदी भाषिकांत मराठी बोचली, तो " मी चव्हाण " मी शंका निरसनाचा प्रयत्न केला  "अरेव्वा, मोठी परंपरावाले आहात, घड्याळवाले की एंजीनवाले? त्याने उत्तर टाळले. इतर बघे ह्या भागात जागा बदलताना त्यांचा अनुभव सांगत होते.  

मला राहती जागा व नोकरी फार काळ टिकवता येत नाही, प्रसंग असेच जुळून येतात की हे खरे ठरते. मी वरील प्रसंगाच्या चार दिवसांनी ती जागा सोडली. पुन्हा तोच प्रकार घडला. माझे सामान ट्रक मध्ये भरणे सुरू झाले होते माझा मुलगा गाडी जवळ होता मी वर सामानाची बांधाबांध करत होतो. तो धावत वर आला होता, " बाबा, दोघे सामान गाडीत टाकू देत नाही, त्यांना पैसे हवे आहेत. " 


गुगल चित्र

मी बघायला गेलो, दुचाकीवर डोळ्याला काळा चश्मा लावून टग्या चव्हाण बसला होता, त्याने मला बघितले व तो चक्क लाजला. " काका, मराठी मानसाने मराठी मानसाला मदत केली पायजेल! " मी राग आवरला - " हे सामान चढवणारे मुद्दाम मराठी आणले आहेत, विचारा त्यांना!! तुमचे साहेब ह्याच इमारतीत आहेत त्यांना विचारतो तुम्हाला किती पैसे द्यायचे, ते रक्कम सांगतील ती मी तुम्हाला देतो. " चव्हाण हसत हसत निघून गेला.  

माझे पैसे न देण्याचे सुख फार वेळ टिकले नाही. सामानाचे ट्रक नवीन जागेत गेले होते. दोन तासाने मुलाचा फोन आला. नवीन जागेत त्या भागातील वाल्मीिक शिष्यांनी गाडीतून सामान काढण्याच्या आधी १०, ००० ची मागणी केलेली होती. त्या शिष्यांनी त्यांच्या गुरुचे पत्रक दाखवून असे पैसे मागणे त्यांचा हक्क आहे असे दरडावून सांगितले होते. सुनेने वाद घातला, मग तिला त्या भागातील एका नेत्याची ओळख मिळाली व शेवटी त्या शिष्यांनी ५०० घेण्याचे मान्य केले, सुनेने नवरा, दीर व स्वत:च्या डोक्यावरून ती ५०० ची नोट तीन वेळा ओवाळली व एका शिष्याला देण्याकरता पुढे केली. शिष्य- "ओवाळून दिलेले पैसे का देता? तुमची भीक नको आम्हाला! " सुनेने लगेच पवित्रा बदलला - "ही नोट मी मंदिराच्या दानपेटीत टाकणार, पुन्हा विचार करा!! " पैसे घेऊन ती िशष्यांची टोळी गेली पण त्या विभागाचा पोलीस हवालदार त्याचा हिस्सा घेण्याकरता मोठ्या थाटात समोर आला.    

सुनेने नुकताच घडलेला प्रसंग त्याला सांगितला व नेत्याने कशी मदत केली हे मुद्दाम न विसरता सांगितले, नेत्याचे नाव ऐकल्यावर तो पोलीस हवालदार बदलला होता, मुलांचे ओळखपत्र मागितले व नाव वाचून निघून गेला.

एका अधुिनक वाल्मीकीने आपल्या अधिकाराचा, पदाचा वापर अयोग्य उमेदवाराला नोकरी देताना केला़ हा उमेदवार कोंकण भागातील असल्याने दर महिन्याला त्या मॅनेजरला काही किलो मासे रतीब म्हणून देत होता. वर्ष उलटल्यावर बढती देताना त्या मॅनेजरने त्या चमच्याला नवीकोरी चारचाकी मागितली व बढती बहाल केली. त्या चमच्याचे लग्न झाल्यावर त्याच्या बायकोला घडलेला प्रकार लक्षात आला. तिने दुसरा अधुिनक वाल्मीकी शोधला व तीच्या हक्काची चारचाकी परत मिळवली.


गुगल चित्र

ही अधुिनक वाल्मीकी मंडळी प्रशिक्षित, पदवीधर आहेत, प्रत्येक क्षेत्रात ही मंडळी कार्यरत आहेत, नवशिक्यांना शिष्यवृत्ती देऊन टोळ्या वाढवण्यात तसेच पैसे वसुलीचे नवीन मार्ग, पद्धतींचे संशोधन करण्यात कार्यरत आहेत. नजीकच्या काळात तुम्हालाअधुिनक वाल्मीकींची भेट घेणे आवश्यक होणार आहे!!!!!!!!  

हे मी माझ्या आय पॅड ३ व पेजेस प्रणालीने देवनागरीचा वापर करून लिहिले आहे, आयपॅड ३ला माझा प्रणाम!!!!!!!!!!