खरे खुरे

पुणे - महाराष्ट्राचे दुसऱ्या क्रमांकाचे तसेच आय टी आणि वाहन क्षेत्रामध्ये भरीव प्रगती केलेले शहर. 

----
पुण्यात मेट्रो सुरू झाली. कोथरूड -चंदनी चौक पासून ते शिक्रापुर, खेडं शिवापुर पासून ते देहू-आळंदी, तसेच हिंन्जवडी पर्यंत पसरलेले जाळे.
साहजिकच, पुण्यात दुचाकी आणि चार चाकी फार पाहायला मिळत नाहीत, शिवाय प्रत्येक मेट्रो स्टेशन ला पी एम टी थांबे आहेतच. शिवाय बी आर टी असल्यामुळे बस सेवा सुद्धा तेवढीच वेगवान, सोयीची, कमी खर्चिक झाले. एवढेच काय, बसेस मध्ये ए सी. शिवाय रस्ते गुळगुळीत. त्यामुळे प्रवास सूध्धा विणा त्रासाचाच !
----
पुण्याचे रस्ते एकदम पाहण्यासारखेच. खड्डे शोधून सापडणार नाहीत, चुकून एखादा खड्डा सापडलाच तर पुणे महानगरपालिकेच्या साईट वर किंवा टोल फ्री नंबर वर फोन केला की लगेच मनपाची खड्डे बुजवणारी गाडी हजर, खड्डा तासाभरात शास्त्रीयरीत्या बुजवला जातो. त्यामुळे गाड्यांना त्रासही होत नाही.
शिवाय चौका चौका मध्ये क्यामेरे असल्यामुळे शक्यतो कोणी सिग्नल तोडतच नाही. आणि एखाद्याने तो तोडलाच तर त्यांच्या गाडी क्रमांकावरून दंड थेट त्याच्या खात्यामधून सरळ घेतला जातो.
एवढेच काय रस्त्यावर ठिकठिकाणी कचराकुंड्या आणि मुतारीची भरपूर सुविधा केली आहे. आणि या जागा वेळोवेळी साफ केल्या जातातच.
रस्त्याच्या प्रत्येक कडेला स्थानिक झाडे मोठ्या प्रमाणात लावण्यात आली आहेत. (जशी वड, पिंपळ, आंबा)
------
पुण्यात झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यात आले, त्यांना शहरच बाहेर राहायला जाग, शिवाय मेट्रो तिथपर्यंत पोचली असल्यामुळे, त्यांनाही पूर्णं सोयी मिळाल्या आहेत. त्यांच्याकडून योग्य ते भाडे वसूल केले जाते, त्याचा उपयोग तेथील जागा आणि इतर सोयी सुविधांचा खर्च भागवला जातो.
पुण्यात एक सुद्धा अनधिकृत घर/इमारत नाही. सर्व व्यवहार कागदपत्रे मायाजाल वर असल्यामुळे कोणाचीही फसवणूक होत नाही. 
घरांचे दर पूर्णपणे सरकार ठरवते. 
शिवाय पाण्याचे योग्य नियोजन केल्यामुळे शहराला पाण्याची कमतरता कधीच भासत नाही. 
मुळा आणि मुठेचे पात्र अतिशय सुंदर आहे. तेथे दोन्ही बाजूने छानशी उद्याने बांधण्यात आली आहेत.
----
पुण्यात मैदाने पूर्वी होती, आता त्यांचे प्रमाण खूप वाढले आहे, शिक्षणाव्यतिरिक्त मुलांना इतर गोष्टी शिकवण्याकडे भर जास्त आहे.
----
आणि एवढे सगळे होउन गुन्हेगारी बद्दल काय बोलायचे .... काही दिवसांपुर्विच पुणे पोलिसांना सर्वात कार्यक्षम असल्याचा अंतरराष्ट्रिय पुरस्कार मिळाला !
जुने लोक म्हणायचे "पुणे तेथे काय उणे" !!!