ओलावा ...

डोळ्यांतूनी टिपूसही मी ढाळत नाही,  
आतल्या आत अश्रू कधी का वाळत नाही?
ओलावा हा सतत वाहतो काळजात ह्या,
फिरणाऱ्या ऋतुचक्रां का तो पाळत नाही?  
दूर पांगल्या आपुल्यांची घुमते आठवण,
वेदनेस ह्या स्नेह कधी का टाळत नाही?
भलत्यांपाठी का फिरते झुरते वेडे मन हे,
हसतमुखाने रीत जगी का माळत नाही?  
फरफट होता दु:ख जाहले गझलेत गोळा,
सौख्य आजचे गझलेस ह्या का जाळत नाही?  
- अनुबंध