अखेरचा हा तुला दंडवत

Balasaheb lr

महाराष्ट्राचे एकमेवाद्वितीय नेतृत्व हरपले.

मराठी माणसाचा त्राता आज लोपला. कणखर व खंबीर नेतृत्व म्हणून ज्याची ओळख होती तो प्रत्यक्षात असंख्य लोकांना जीव लावणारा एक महान लोकनायक होता. सेनेच्या सुरुवातीच्या दिवसातल्या त्या झंझावाती सभा, लोकांना पडलेली बाळासाहेबांची मोहिनी, सभांना जमणारा व श्वास रोखून अखेरच्या शब्दापर्यंत कानात प्राण आणून ऐकणारा जनसमुदाय आजही डोळ्यापुढे सगळे उभे आहे.

आजची सर्व वर्तमानपत्रे केवळ 'कै. बाळासाहेब ठाकरे' या एकाच विषयाला वाहिलेली आहेत, त्यांच्या वैशिष्ट्यांवर, जीवनप्रवासावर आणि राजकीय कारकीर्दीवरच्या लेखांनी वाहत आहेत, याउप्पर मी इथे आणखी काय लिहिणार? बाळासाहेब हा मुंबईकराच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक होता आणि निदान आमची पिढी हयात असेपर्यंत तरी असेल.

राजकारणी, साहित्यिक, कलाकार, उद्योगपती, खेळाडू आणि सर्वसामान्य माणूस या सर्वांशी इतकी जवळीक असलेला दुसरा नेता निदान माझ्या पाहण्यात नाही.

मा. श्री. बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र श्रद्धांजली.