मी नाही रडणार उद्या

हा वाडा पडणार उद्या
मी नाही रडणार उद्या

तुझा दिलासा आजच दे
नको तेच घडणार उद्या

एक तूच ईश्वर वेड्या
ही सृष्टी सडणार उद्या

तुझे विठ्ठला हे कोडे
तुलाच उलगडणार उद्या

आज वैभवा जगून घे
नाही परवडणार उद्या