मनाने घेतले आहे नशेचा आसरा घ्यावा
जवानीच्या टकील्यावर जरासा मोह चाखावा
मला भेटायला स्वप्नातसुद्धा येत नाहिस तू
कशाला मी तुझ्यावर एक माझा शेर खर्चावा
तुला वाईट वाटावे असे मी वागतो आहे
तुझा चांगुलपणा थोडातरी वाईट वागावा
तुझ्या वाटेकडे डोळे.......बिजेपासूनचे दादा
जरी जमणार नसल्याचा तुझा आलाय सांगावा
____________________________________
कशाने पांडुरंगासारखे ते सावळे झाले
कधी ठरले बरे माझे मनाला रंग लावावा
असे काहीतरी व्हावे मनाला छान वाटावे
जसे की शेर माझा विठ्ठलाची आरती व्हावा
विठ्या माझा तुझ्यावर तेवढा अधिकार आहे ना
तुझा असला जरी हा शेर मी माझाच मानावा