अरूगुला

  • अरूगुला १ पॅकेट
  • पाव कांदा , ३-४ लसूण पाकळ्या
  • लाल तिखट अर्धा चमचा, धनेजिरे पूड अर्धा चमचा
  • मीठ चवीपुरते, चिमूटभर साखर
  • तेल, मोहरी, हिंग, हळद
२० मिनिटे
२ जण

मार्गदर्शन : अरुगुला चिरून धुऊन घ्या. रोळीमध्ये चिरलेला अरूगुला घालून त्याखाली ताटली ठेवा म्हणजे त्यातले पाणी निथळून जाईल. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात फोडणीकरता थोडे तेल घालून त्यात मोहरी, हिंग व हळद घाला. नंतर त्यामध्ये चिरलेला कांदा व  लसूण पाकळ्या घाला. कांदा व लसूण थोडे परतून घ्या. नंतर त्यात चिरलेला अरुगुला घालून त्यावर झाकण ठेवा. २-३ सेकंदाने झाकण काढून परता. असे दोन तीन वेळा केले की भाजी चांगली शिजेल. नंतर त्यामध्ये लाल तिखट, धनेजिरे पूड, साखर व  मीठ घालून परत एकदा भाजी परतून घ्या व झाकण ठेवा. २-३ सेकंदाने झाकण काढून भाजी नीट ढवळून घ्या.  भाजी तयार झाली आहे. या भाजीची चव थोडी उग्र लागते पण छान आहे. करडई भाजीसारखी थोडी चव जाणवली.

टीपा नाहीत.

मी