बदलुयात स्वतःला थोडंस!

                              आज खूप दिवसांनी लिहिण्याचा योग येतोय. तसं बरेच
वेळा इच्छा झाली पण वेळ नाही आणि त्यापेक्षाही परफेक्ट विचार नाहीत, मग काय
"plan canceled". आज जरा डोकं ठिकाणावर आहे एखादवेळेस. सध्या आपण
बघतोय आपल्याकडे काय चाललंय. दिल्ली असो
कि आणि कोणतं शहर किंवा भारत असो कि अमेरिका, काहीनाकाही
भयंकर होतंय. ह्या सगळ्यामध्ये common अशी एकाच गोष्ट आहे आणि ती म्हणजे "माणसांनी
माणसाचा केलेला छळ!". हो,
खरंय हे. सांगाना
ह्या सगळ्या गुन्ह्यांमाधला एक तरी गुन्हेगार सरळ डोक्याचा वाटतो का? अर्थात गुन्हेगार हा गुन्हा कधी सरळ डोक्यानी करतो अश्यातला भाग नाही पण चोरी, दरोडे असे
गुन्हे आज कल साधे सोप्पे वाटायला लागलेत. Actually, असं
म्हणताना मलाही लाज वाटतीये पण माणसाची बौद्धिक पातळीच इतकी खालच्या थराला गेली आहे म्हणजे ह्या हिडीस गुन्ह्यांचा reference घेतला
तर चोरी आणि दरोडे साधेच वाटणार. लाजिरवाणी
वाटली तरी खरी गोष्ट आहे हि.

                              काल का
परवा डॉ. राणी बंग
ह्याचं statement वाचलं,
"आदिवासी लोकांमध्ये बलात्कार होत नाहीत." हे एक
वाक्य आपल्यासारख्या स्वतःला हुशार, शिकलेल्या
आणि शहरात राहणाऱ्या लोकांना किती काय सांगून जाणारं आहे. अहो, भारताची संस्कृती हि पाश्चिमात्य  संस्कृतीच्या
प्रभावामुळे बिघडली आहे, आपली मूळ
आपण विसरलो आहोत ह्या अश्या चिंतांपेक्षा आधी माणूस म्हणून आपण काय विसरतोय हे बघायची जास्त गरज आहे. एखादं जनावरसुद्धा दुसऱ्या जनावराला अशी वागणूक देत नाही. एखादा एरवी
जर निर्घृणपणे वागला तर आपण म्हणतो काय जनावरासारखा वागतो. आता एखादवेळेस जनावर एकमेकांना म्हणत असतील कि काय माणसासारखा वागतो. मलाही लिहिताना हे शब्द झोम्ब्तायेत पण आहे हे असं आहे. 

                                       

                              बरेच वेळा
असाही विचार समोर मांडला जातो कि आज कल हे फारच वाढल आहे, पण खंर
म्हटल तर हि गोष्ट फार जुनी आहे. फरक फक्त
एवढाच आहे कि पूर्वी असं काही झालं तर त्या बद्दल समाजात बोललं जायची नाही आणि आता त्याच्बद्दल न्याय मागितला जातो जी नक्कीच चांगली गोष्ट आहे. ह्यातून
तरी काही टक्के लोक शिक्षणाचा योग्य वापर करताना दिसतात. म्हणजे सगळच
वाईट चालला आहे असं नाही पण जास्तीत जास्त जे होतंय ते योग्य नाही. स्त्रियांनी
स्वतःला नखशिखांत झाकून समाजात वावरणा हा काही ह्या समस्येचा तोडगा असू शकत नाही कारण असंच असलं तर मग पूर्वीही ह्या गोष्टी का होत होत्या. अश्या प्रकारचे निर्बंध फक्त स्त्रियांवरच का? अश्या अवस्थेतला पुरुषही मग अश्या बळजबरीचा शिकार होऊ शकतो पण शक्यतो हे असं होत नाही. असं म्हणायचं कारण कि अत्याचार हा एका व्यक्तीनी दुस्र्याव्याक्तीवर केलेली बळजबरी असते त्याचा त्या व्यक्तीच्या genderशी काहीही संबंध नसतो. 
                               भारतीय सिनेसृष्टी ज्याला आपण बॉलीवूड असं म्हणतो हि ह्या हिडीस वागणुकीला जबाबदार आहे का? मला नाही
वाटत. पूर्वी कुठे
होता असं काही पण तरीही गुन्हे घडायचेच ना! उगाचं कारणं
द्यायची म्हणून हे एक कारण. कधी शिकणार आपण आपल्यातला दोष शोधून  काढणं? का
असं काही झालं कि कारणांचा शोध घेतला जातो? "मी नाही
ह्यांनी केलं" हि वृत्ती आपल्यात इतकी भिनली आहे न कि खंर काय ते आपण सगळे विसरलो आहोत. फक्त दोष
हे दुसर्यातच असू शकतात, दुसरा हा
नेहेमी चुकीचाच आहे असंच आपण धरून चालतो. एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला पण त्याच्या बदल्यात लोकांमध्ये जरतारी जाणीव आली. त्याच लोकांनी जेव्हा आपला आवाज उठवला ते पाहून मात्र काही सामाज कंटकांना ते सुद्धा खुपलं. कोणाचं काय
तर कोणाचं काय! 
                               आहेत हे
विचार खूप भयंकर आणि सद्ध्या सगळे जण हेच बोलत आहेत. पण हेच
 गरज आहे म्हणून हे विचार तुमच्या समोर मांडलेत. भाषाही काही
फार अलंकारिक नाही किवा सभ्य तर त्याहूनही नाही पण आत्ता भाषेपेक्षा त्यातल्या विचारांवर भर देण जास्त महत्वाचं आहे. एखादवेळेस
मी म्हणतो तितका समाज मागासलेला नसेलही पण लिंबाचा एक थेंब सगळ्या दुधाला नासवतो आणि माझ्या सारख्या तरुण पिढीला आमच्या पुढच्या
पिढीला असं जग दाखवायचं नाहीये. बदलुयात
स्वतःला थोडंस, तेवढ केलं
तरी खूप फरक पडेल. "Better late than never!"