"घर, मृण्मयी, तुझे हे; ही पंढरी सुखाची"
मग त्यास का न येई सर परकरी सुखाची?
डोळ्यांत आसवांचा होता खडा पहारा
शिरली कशी कळेना स्वप्ने तरी सुखाची
चटके परिस्थितीचे दिसता नये कुणाला
लिहिली अशीच जाते कादंबरी सुखाची
केव्हा तरी अम्हाला दे दूध, तूप, लोणी
का कोरडीच खावी मी भाकरी सुखाची?
(ताकावरी निवावी तृष्णा जरा दुधाची)
बघते सजीव चित्रे पडद्यावरी सुखाची
करवून फार घेते आजन्म ती परिश्रम
सोडून देत आहे मी चाकरी सुखाची
तृप्ती तनामनाची, कर्तव्यपूर्ततेची
याहून काय व्याख्या साठोत्तरी सुखाची?
छातीत 'सज्जनां'च्या भरली असेल धडकी
बसले लिहावयाला मी वासरी सुखाची