सुशिक्षित का फ़क्त उच्चशिक्षित

आजकाल उच्चशिक्षणाचे एक पेव माजले आहे . जो तो परदेशात शिक्षणासाठी जातोय. पण मुळात आपले संस्कार विसरत चाललोय असे वाटत राहते. आता परवाचे उदाहरण बघा. मी आणि माझी बायको बाजारात खरेदी साठी गेलो होतो. बाजारात खूप गर्दी होती. तिथेच एका कोपऱ्यात पानाची टपरी होती. तिथे काही मुलं सिगरेट ओढत होते. चांगले उच्चशिक्षित होते. बहुधा मेडिकल चे असतील. ते सिगरेट चा धूर सोडत होते तो तिथून जाणाऱ्या बायकांच्या तोंडावर जात होता पण त्याचे त्यांना काहीच वाटत नव्हते. एका स्त्रीने त्यांना हटकले तर म्हणे "इथे टपरी आहे आम्ही इथेच  ओढणार" आता सांगा यांना सुशिक्षित म्हणायचे की फक्त उच्चशिक्षित ?

      या वरून मला काही वर्षांपूर्वी दिल्ली ला फिरायला गेलो होतो तेव्हाच एक किस्सा आठवला. आम्ही सर्व घरातली मंडळी दिल्ली ला फिरावयास गेलो होतो. आम्ही भाड्याने गाडी घेतली होती आणि दिल्लीतच एक गाईड घेतला होता. आम्ही रात्री दिल्लीत पोचलो होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गाईड आम्हाला घेऊन जाणार होता. माझ्या वडिलांनी त्याला सांगितले की सकाळी बरोबर वेळेत ये. 
      दुसऱ्या दिवशी सकाळी तो गाईड बरोबर वेळेत आला व आमची दिल्ली सफर सुरू झाली. संपूर्ण दिवस तो आमच्या सोबत होता. तो एकदम गरीब होता जास्त शिकलेला नव्हता. त्याला बिडी चे व्यसन होते पण कोणत्याही क्षणी त्याने आमच्या समोर बिडी ओढली नाही. एखाद्या प्रेक्षणीय स्थळी तो आम्हाला सोडी आम्ही ते ठिकाण पाहून येईपर्यंत तो बिडी ओढून घेई, व आम्ही येताना दिसलो की लगेच बिडी फेकून देई. 
    आता वरील दोन्ही प्रसंगातील कोणाला सुशिक्षित म्हणायचे? खरेच परदेशात शिक्षण घेऊन माणूस सुशिक्षित बनतो? लोग मुलांना उच्चशिक्षण देतात पण आपले संस्कार द्यायला विसरतात मग हिच मुलं आपल्या पालकांना म्हातारपणी वृद्धाश्रमात ठेवतात. मग त्या पालक आपल्या मुलांना दोष देत बसतात. पण त्यांना संस्कार द्यायची जबाबदारी कोणाची आहे? 
    त्यामुळे सर्वांना माझे सांगणे आहे की आपल्या मुलांना आधी सुसंस्कारित बनवा मग उच्चशिक्षण द्या. मग खऱ्या अर्थाने ति सुशिक्षित बनतील.
धन्यवाद ,
माझे हे पहिलेच लिखाण असल्याने काही चुकल्यास माफी असावी.