सटवी लिहून जाते भाळी कथा समस्त
पण पाप मात्र माझे ठरवील चित्रगुप्त
गीते, तुझी कशाला पारायणे करावी?
निष्काम कर्मयोगी राही जगात भुक्त
सांगो हरी कितीही स्थितप्रज्ञलक्षणे पण
रक्तात मोह आदिम धर्माहुनी सशक्त
धर्मात आणि स्वर्गी आत्म्यास मान आहे
मातीविना कुणाला काया हवी निरस्त?
ओवाळताय कसल्या लोकां, सुवासिनींनो?
देशात काजव्यांच्या काळोख औक्षवन्त
निजतात जे फुलांच्या बाहूत 'भृंग' कायम
मधुरात्र संपल्यावर करतील, "हन्त, हन्त"