पोलिस - एक छोटासा अनुभव

गोरेगाव येथील एका सिग्नलला थांबलेलो असताना एका पोलिस हवालदाराशी झालेला माझा संवाद...

मी - साहेब, एक विचारू का?
पो.ह. - बोला.
मी - तुमचं हेल्मेट कुठाय?
पो.ह. - तुमाला काय करायचा?
मी - अहो, पोलिसांनीच नियम नाही पाळले तर बाकी जनता काय करणार?
पो.ह. - तुमी तुमचं काम बघा.
मी - नाही, तरी पण सांगा ना.
पो.ह. - ए, तुला काय करायचाय? पोलिस स्टेशनवर हाय.
मी - डोकं सोबत आणलं आणि हेल्मेट पोलिस स्टेशनवर? का डोकं पण तिथेच ठेवलंय?
पो.ह. - ए *सडीच्या, माज चढलाय का?
मी - अहो, मी हेल्मेट घातलंय, तुम्ही नाही. मग सांगा माज कोणाला आहे?
पो.ह. - ए *वड्या, तू घातलंय ना? मग बस गप. आम्हाला कामं असतात, हे सगलं करत रायलो तर कामं नाय होनार.
मी - साहेब, आम्ही अशी कारणं सांगितलेली चालत नाहीत तुम्हाला. आम्हाला कामं असली तरी तुम्ही पावती फाडतातच. तुमची पावती कोणी फाडायची?
(ह्या वाक्यावर आजूबाजूचे चारदोन जण हसायला लागले.)
पो.ह. - तुला फाडाची हाय? फाड.
मी - तेवढं कुठलं भाग्य आमचं? पावती पुस्तक आणि अधिकार असता तर नक्की फाडली असती पावती.
(तेवढ्यात सिग्नल हिरवा झाला.)
पो.ह. - ए *डेच्या, तुज्या **ची *ड, घे गाडीचा लंबर लिऊन आन कर कंप्लेन.
मी - कुठे करायची कंप्लेंट?
पो.ह. - ए, *दरचो*, नेऊ का तुला पोलिस स्टेसनवर? तुज्या *डीत बांबू घालतो बग आता.
मी - चला, जाऊयात पोलिस स्टेशनवर. कुठल्या स्टेशनवर जायचं?
पो.ह. - तुज्या आ** *च्ची* माजा *ड. आत्ता काम हाय मनून सोडतोय तुला. परत भेटलास ना, अशी *ड मारतो बग तुजी.
मी - अहो, परत कशाला? आत्ताच बोला ना काय ते. चला की पोलिस स्टेशनवर.
मी - ओ साहेब...
मी - ओ साहेब...

पोलिस हवालदार साहेब भराभर लेन बदलत, दुसऱ्या गाड्यांना कट मारत निघून गेले. घाईत होते ना...