यांना चर्चेसाठी बोलावणे योग्य आहे का?

महंमद अजहरूद्दीन, अजय जडेजा, नयन मोंगिया यांना क्रिकेट सामने निकालनिश्चिती प्रकरणात अडकल्यानंतर कारकीर्दीवर पाणी सोडावे लागले. देशभरात त्यांची प्रतिमा मलीन झाली.  या प्रकरणाला आज दहापेक्षा अधिक वर्षे उलटून गेल्यानंतर या लोकांना दूरचित्रवाणीवर बोलावले जात आहे व घडलेल्या किंवा घडणाऱ्या सामन्याबाबत त्यांची महत्त्वाची मते विचारली जात आहेत. 
अशा लोकांना मते प्रदर्शित करायला बोलावणे योग्य आहे का?
हिंदी चित्रपटाच्या अखेरीला शिक्षा भोगून आल्यावर नायकाचा स्वीकार सर्व समाज करतो,  त्याला पुन्हा सन्मानाने जगण्याची संधी देतो व सगळीकडे आनंदी आनंद होतो, असे काही वास्तवात होत आहे का?