पायरीचा दगड (कविता)

          पायरीचा दगड 

राघु-मैनेपरी
होतो विहरत,
माणसांच्या राईतून
अवती-भोवती आहेत
माणसंच, असं समजून
कशी, कोण जाणे ?
गिधाडं चार-पाच,
माणसातली
आली सरसावून
करून जेरबंद राघुला
पडली तुटून माझ्यावर,
तोडून लचके
वखवखलेल्या आधाशासारखे
खून पाडून आब्रुचा
गेले संभाविता सारखे,
होतं जगायचं,
मला माण्सांनो
सजा त्यांना देण्यासाठी,
' मी तर मेलेच होते, '
पण, माय-बापाच्या जगण्याला
बळ थोडंसं देण्यासाठी,
खुणगाठ एक बांधली मनाशी
झुंजता-झुंजता म्रृत्युशी
सोडून इरादा जगण्याचा
पत्करले मरणाशी,
जातांना स्वर्गात
पाहिलं मी,
न्यायासाठीचा तुमचा कंठशोष,
अश्रू पुसनारे हात, नि
बदलनारा कायद्याचा शब्दकोश,
ऊद्वीग्न मी,
वाटलं ओरडावंसं
थांबवा हे सारं,
थांबवा ते मुर्दाड हात,
मोती नका विटाळू
माझ्या आई-बापाचे,
लाउन तुमचे शेंदाड हात,
अरे ! करायचंच असेल तर
करा हे,
चढवा त्यांना फासावर,
राखून आब्रुशी ईमान
पुन्हा न पडो शील कुणाचे बळी
म्हणून तर पत्करलंय,
मी हे बलीदान,
धाडले जातील जेंव्हा
ते यमसदनी,
असेल दिवस तो भाग्याचा,
असेल तेंव्हा मी,
दगड पहिला
न्यायमंदिराच्या पायरीचा....
                                          ---लेखन ता. ०६ /०१ / २०१३
                                              -उद्धव कराड. (मो. नं. ९८५०६८३०४५)
                                                मु. जळगांव, ता. निफाड, जि. नाशिक.