समानधर्मी कविता खेळ

काल सहज काही यमकेगिरी करत असताना एक चारोळी सुचली. आणि सहज मनात आले की मनोगतींपुढे ही कविता ठेवून अशा समानधर्मी कविता लिहिण्याचे आवाहन करावे. माझी कविता ही एक संस्कृत - उर्दू अशा मिश्र भाषेत रचलेली मराठी कविता आहे. तिच्या अंगारूपाशी, प्रकृतीशी मिळत्याजुळत्या 'भगिनी-कविता' रचून या उपक्रमास प्रतिसाद द्यावा.

असो. घडाभर तेल झाल्यानंतर आता नमन करतो. तर ही आहे माझी कविता

अशी कशी तू सुहास्यवदना
खळी तुझ्या गालिची नि कातिल
तुला न ठावे किती जणांचे
पदावघाते ठुकारले दिल

प्रतिसादांच्या प्रतीक्षेत ...