पंचविशीत काय गेले ....

पंचविशीत काय गेले .... जणू सर्वांच्या नजरेत आले...

कालपर्यंतची लहान मी... एकदम मोठी झाले.....

"आता मात्र ठरायला हवं" ... आईनच ठरवलं ...

आपले म्हणणे शेवटी तीने  गळी बाबांच्याही  उतरवलं ...

हेही वेगळं आईच ....रुप मला दिसलं...

कोणी सांगेल मला ... यात माझं काय चुकलं?

फ़ोटो-पत्रिकांची देवाण-घेवाण , गुण-मिलनाचे हीशोब ...

हल्ली आमच्या घरी , जोरात चालू आहे शोध .....

जन्मगाठी म्हणे स्वर्गातच ठरतात....

अन वेळ आली की त्या भूतली घडतात...

मधोमध मी उभी जिवनाच्या उंबऱ्ञावर....

"माप ओलाडणं" ..... आता काही दीसांवर...

उंबऱ्ञापअल्याड उभी आई ... ओठावर गाणी ...

आवाजात हुंदका.... अन डोळा पाणी ....

काय तीच्या मनात ... उमजायचं नाही ...

कदाचीत जोवर.... होत नाही मी आई ...