जगतोय घेऊनीया मी रोज नवे सोंग ,
प्रतीमा आरशात , ओळखणे कठिण झाले,
माझीच सावली न रहीली न माझी,
माध्यानं वेळी , चालणे कठीण झाले
धागे नात्यातले दुरावले हे कीती
ओळख एकमेका सांगणे कठीण झाले
खोटेच खणकते नाणे बाजारात जगाच्या,
मोकळा श्वास घेणे सत्यास कठीण झाले,
वारे अधुनिकतेचे दावती नाच नंगा ,
झाकणे लज्जा संस्कृतिसही कठीण झाले,
ऋतु-चक्र हेही बनले बेहीशोबी,
लहरीपणा दावी केव्हा-कोठे-कीतीही,
किती ऱ्हास केला अविचारी मानवाने ,
पात्रात वाहणे गंगेसही कठीण झाले ,
कंत्राट-मंत्र्यानी बांधल्या सांठ-गाठीं ,
छप्पर डोक्यावरी मीळणे कठीण झाले ,
अवतार घ्यावया वेळ घेतोय का तु बहु .....
कुशी योग्य तुज का , मिळणे कठीण झाले ....?