जखमांचे पेव
काळजात माझ्या जखमांचे पेव आहे
रोज ईख पिणारा मी महादेव आहे
होते रोजच पारध किती कळ्यांचे का ?
गरुड थंडे नि ससाण्यांना चेव आहे
पानेच माझ्या मुखी, रंगले ओठ दुजे
चुन्याचीच तुझ्या मजकडे ठेव आहे
कुठे चावडी, बावडी वेस ना कुठेही
जुन खोडांचाच आता तिथे देव आहे
बालपणी खाल्ली माती तिच मला खाते
काळीमायच या जिवनाचा शेव आहे
-उद्धव कराड , (मो. नं. ९८५०६८३०४५)
मु. जळगांव, ता. निफाड, जि. नाशिक.