वेडा मुग्गा, शाना मुग्गा ... ??
शाळेत जातो तरी अजून
तोंडात बोट घाल्तात का ?
वेडा मुग्गा म्हण्तील ना !!
हात कित्ती शी शी आहेत
तस्सा खाऊ खातात का ?
वेडा मुग्गा म्हण्तील ना !!
जर्रा थोडं लाग्ता कुठे
आई करून रडतात का ?
वेडा मुग्गा म्हण्तील ना !!
खाऊ देता कुणी कुणी
देना गजर करतात का ?
वेडा मुग्गा म्हण्तील ना !!
रात्री मात्र माझ्या कुशीत
गाणी ऐकत झोपशील ना
वेडा म्हणूदे कुणीही मग
गळ्यात हात टाकशील ना
शाना मुग्गा होशील ना ???