आठवण सख्याची

सख्या तुझी आठवण, जसा सडा प्राजक्ताचा
रोज पडे दारापुढे, मनी रुंजी घाले साचा

तुझे ओढीने भेटणे, वाटे थेंब अमृताचा
ओठी लावता विरून जाई, साठवू मी कैसा?

माझे आयुष्य फुलले, गंध त्याते केवड्याचा
कधी लागेल का तुला, ठाव माझ्या अंतराचा?

ठाव लागला तरीही, उरे न्युनता तयाला
भेट तुझी माझी ठरो, प्रवास अनंताचा!!!