ओंजळ
जनरुढींचे पाळून बंधन
पवित्र नातं जोडलयं तुझ्याशी
सर्वस्वाचं देऊन आंदण
अचानक यावे कुणी जिवनी
आणि जुळावी अखंड नाती
विश्वासाने द्यावा खांदा
आधाराला हात ही हाती
तुझिया सहवासाने मम जिवन
फुलले, सर्व सुगंधित झाले
सकल गवसले मला हवेसे
जे जे नयनांना आवडले
आस कशाची मुळी न उरली
दिलेस मज तु ओंजळ भरून
करात तुझिया उरे काय रे
कधी वाटे ते घ्यावे पाहून