" धन्य आज दर्शनाने तुझ्या - "

'
नाम जपलं विठ्ठलविठ्ठल, मी तुला पहाया
रोज मूर्ति बघणे छंदच मनातून माझ्या ||
आज दर्शनाने झाली धन्य धन्य काया          
डोळियाचं फिटलं पारणं जीव नाही वाया ||
चाल चालुनी शिणली रे जर्जर ही काया 
ध्यास घेतला होता मी, काळजामधुनी या ||
तूच ध्यानि तूच मनी रे पंढरिच्या राया  
शेवटी मला पावला देवा तूच विठू राया ||
व्हावं  सोनं  देहाचं  ह्या, वाटले मना या  
डोळियाचं  पाणी माझ्या, गेलं  नाहि वाया ||
धन्य आज दर्शनाने तुझ्या पंढरीत मी या  
आनंदानं लोटांगण हे पायावर तुझिया || 
.