हे प्रिये..

हे प्रिये...

रंग तुझा उजळ सावळा
उजवा नेत्र किंचित तिरळा
उडवुनी अपरे नाक
डाव्या डोळ्यात अंधुक धाक

अनुरागाचे तोतरे बोल
विरोधाचे प्रयत्न फोल
आक्रमुणी हा देह गोल
दाविसी मज तू खगोल

राजेंद्र देवी