विठ्ठल भेटवा....

चाली पंढरीची वारी,

टिळा बुक्क्याचा शिरी,

तुळशीमाळ गळा रुळी,

मन विठुच्या राउळी ॥१॥

झांज मृदुंग दुमदुमला ,

नभी गुलालं उधळीला,

विठ्ठल नाम गरजला,

वेड लागले जिवाला ॥२॥

चंद्रभागी तीरी उभा,

माझा रुक्मिणीचा सखा,

कोणी सांगावा  धाडा ,

आडोश्याल मीही उभा ॥३॥

ओढ भेटीची लागली ,

कधी पाहीनं माऊली ,

मागे संसार टाकीला,

एकदा विठ्ठल भेटवा

पार होईन भवतीरा ॥४॥