देव विठ्ठलू
ऐसा भक्तिचा सोहळा
भुतळी या नाही दुजा
वारकऱ्यांत दिसला
धन्य पंढरिचा राजा
भुके व्याकुळला कोणी
उभा दारी साद घाली
घास घालताची तेणे
धन्य एकादशी झाली
जिवाभारी गांजलेला
धावा करी मदतिला
हात देताची साजीरा
देह चंद्रभागे न्हाला
मनची गरुड खांब
मुखी नामजप केला
अंतरीच माझ्या मला
देव विठ्ठलू भेटला
ज्ञाना, तुका, एका, चोखा
तेणे जनी बोध केला
चालू जाता वाटे तेची
मनी सावळा तोषला
-उद्धव कराड, (मो. नं. ९८५०६८३०४५)
मु. जळगांव, ता. निफाड, जि. नाशिक.