वाटते मजला भिती - (गझल)

जीवनाची सांगता ही वाटते मजला भिती 

ऐकण्याला कोणि नाही वाटते मजला भिती 
सागरावर का उसळती जीवघेणी वादळे
 हा किनारा एकटा ही वाटते मजला भिती 
ढोलताशा ऐकुनी मज खूप होतो त्रास हा
देवळातिल शांततेची वाटते मजला भिती 
वाटले घ्यावा विसावा टेकुनी खांद्यावरी
 वाट ती अडवील कोणी वाटते मजला भिती 
माजलो पैशात लोळत चेहरा सुजला किती 
ओळखेना आरसाही वाटते मजला भिती 
जागणे अन् झोपणे का फरक नाही राहिला 
जीवनाची ओढ नुरली वाटते मजला भिती
.