चालतो मी
राशीत चांदण्यांच्या मलाच सांभाळीत चालतो मी
रातीत वेदनांच्या सुखाला धुंडाळीत चालतो मी
राईत बेशकीने खुशाली हिंडावे अशी मिजाशी
झुंडीत माणसांच्या मुखांना न्याहाळीत चालतो मी
नेले तु रंग रंगीन भेटींचे त्यांची पुटेच मागे
कोलत्यांनी त्यांच्या मनाला तेजाळीत चालतो मी
पेरतांना साखरेला प्रेमाला तु दिलीस तिलांजली
वैषयीक चटकेची गुलाबे फेटाळीत चालतो मी
वेळीच सावराया मला नाही आधार तो मिळाला
खोलातल्या पायांनाच आता कवळीत चालतो मी
-उद्धव कराड, (९८५०६८३०४५)
मु. जळगांव, ता. निफाड, जि. नाशिक.