शब्दफ़ुले
काव्यरुपी ही शब्दफुले वाहीन
देवा तव चरणा
दे सन्मती अन् सद् बुद्धी रसिका
करण्या रसग्रहणा
विनम्र मी ही तुजसम त्यांचा
दे आशिश मजला
घडो मम सेवा काव्यरुपी
मी नमितो रसिकाला.
मंतरून टाकी सगळे त्रिभुवन
टेकुदे आभाळ धरणीला
रसिक पाहुदे स्वर्ग सौख्य अन्
मिळो सामर्थ्य हे मजला.
आणि कायसे घडले अवचित
तु ऐकीला माझा धावा
मनीची झाली पूर्ण आस आजि
रसिक जाणितो माझ्या भावा.
काव्य स्फुरावे, पदी गुंफावे
वाहावे तुझ्या पदा
हाची ध्यास अन हिच आस
देवा पुरवी सर्वदा.
............सखी