फुलारून गेलो , दवारून गेलो

फुलारून गेलो , दवारून गेलो

तुझ्या आठवाने बहारून गेलो,

चांदव्याचा तुझा पहिलाच स्पर्ष

रोम-रोम रोमांचित , ओथंबिला हर्ष ,

स्वप्नात , सत्यात तुझ्या सवे न्हालो

आंतरीक सुखाने वाहवून गेलो ,

मोहपाशात  ईतुका गुरफटून गेलो

जन्म-जन्मांचे वचन  देऊन गेलो ......