खूप काही सांगण्याचे हेत होते

खूप काही सांगण्याचे हेत होते

काव्य दुखर्‍या अंतरीचे दूत होते

शब्द होते, अर्थ होते, द्वैत होते

का असे तुकड्यात माझे गीत होते?

 
प्राक्तनाने मी कवी झालो असावा

भाग्य उदयाला खरे तर नेत होते

 
कूस कवितेची कशी उजणार, सांगा
?
क्षेत्र वांझोटे, नपुंसक रेत होते

 
राहिले सांगावयाचे ते तळाशी

पृष्ठभागी काव्यसदृश प्रेत होते

 
जे लिहू, मानेवरी येऊन बसते 

वर्तमानाचे अखेरी भूत होते

 
कोण, कुठला तू, स्वत:ला पूस 'कोहम्‌'

वेद रचणारे कवी अज्ञात होते