अशी वाहने येती - विडंबन

(चाल - अशी पाखरे येती - )

अशी वाहने येती, आणिक ढुशी देऊनी जाती 
दोन दिशांनी धावत थांबत, दोष दुजाला देती ...    
खांब तो मला कधि ना दिसला, ताठा कोठे अता राहिला 
 जरा खालुनी, जाय उखडुनी, तारा वरच्या झुकती ...    
पुढून येता पोलिस दिसले, मी स्कूटरवर मला तोलले   
नव्हते लायसन्स, घरीच ते तर, कुंठित झाली कुमती ... 
  हात एक तो पुढेच सरला-  काठीवर खात्रीने फिरला- 
देवघेवीतील सवयी अजुनी, कुठून मज त्या कळती ...    
पुढे तयांच्या खाण्यासाठी, मीच हात ते धरले हाती    
त्या घडल्या तोडीची आता, दूर पसरली ख्याती ....
.