डोंबारी

डोंबारी

कुठेतरी रस्त्याच्या कडेला
उभारली एक पाल
जगण्यासाठी करीत होते
आपल्या जिवाचे हाल

अचानक पडली धाड
सगळ्यांस जेरबंद केले
कोठल्यातरी चोरीचे
आळ त्यांच्यावर घेतले

करू लागले विनवण्या
मायबाप सरकार
लाथा बुक्क्यांनी केले
सर्वांना बेजार

वदवू शकले न काही
घेतली त्यांनी माघार
कडोसरी चाचपीत उभे
हाच उद्याचा आधार

राजेंद्र देवी