सवय होता जरा...

सवय होता जरा जिव्हाळ्याची
वेळ होते कशी निरोपाची?

हाच होता विचार निजतांना
रात्र बहुतेक आज वैऱ्याची

आज घालू नको नवे कोडे
उत्तरे सांग काल परवाची

हात माझा तिने असा धरला
काळजी वाटते इराद्याची

येवढी मोकळीक दे दुनिये
फास माझा मला निवडण्याची

----------जयन्ता५२