हिंदोळा
शीतल हि सांज जरी
मनास पोळती झळा
झुलतो उरात माझ्या
तुझ्या सयींचा हिंदोळा
होती साथ तू जोवर
वैशाख मी न पाहिला
ओल्या स्पर्शातूनी तुझ्या
रोज श्रावण भोगला
पांघरून चांदणे ते
झालो मुलखा वेगळा
गेलीस तू.... अन् मी हा
जगा पासून वेगळा
झुलतो उरात माझ्या
तुझ्या सयींचा हिंदोळा......
-उद्धव कराड, (मो. नं. ९८५०६८३०४५)
मु. जळगाव, ता. निफाड, जि. नाशिक.