हझल

 
ते वार लाटण्याचे चुकवू कितीक आता
हा पोळपाट हाती तोही फुटेल आता

पाठीस ढाल केले त्या लाटण्यासमोरी
डोक्यावरी निशाणा धरणार हाय आता

तो संपला 'पुरुषदिन' कळता तिला अखेरी
लोटांगणाविना ना पर्याय काय आता

प्राविण्य नेमबाजी कौतूक फार झाले
का भोगणे तडाखे मज ह्या वयात आता

ती सात जन्म नशिबी हिटलर म्हणून आली
आज्ञा किती झुगारू उरले न त्राण आता  . .
.