चोरी गुन्हे

चोरी गुन्हे दरोडे हे चार ठाव आहे
प्रत्येक गाव आता माझाच गाव आहे

सार्‍या पराजितांचा आरोप हाच आहे
पंचामधील कोणी भलताच साव आहे

हा नाच माणसांचा तो नाच माकडांचा
कोणावरी कुणाचा सांगा प्रभाव आहे ?

वाट्यास का कधी ना माझ्या वसंत आला ?
शिशिरावरी तिच्या का माझेच नाव आहे

खाणीत कोळशाच्या मिळतात रत्न काही
एखाद सचिन असतो एखाद राव आहे

शतकात या अम्हाला 'द्रष्टा' कुणी मिळेना
'नग वापरा नगाला' म्हणुनी दबाव आहे

--------------------------------------------  जयन्ता५२