सुधारणा

भांडण हा संसाराचा पाया आहे ना? मग लोक असा का करतात? बायकोशी भांडताना नको त्या शब्दांचा वापर करतात... अश्या प्रकारच्या नवऱ्यांमध्ये सुधारणा कशी करावी?

मला याची काळजी वाटते की त्यांची मुले बाहेर तेच बोलतील आणि त्यांना असेही वाटेल की मुलींशी बोलण्याची हीच पद्धत असते.

आजकाल मुलांच्या बोलण्यातही तेच ऐकू येत. तेच ते.. परत आजकाल गाण्यांमध्येही अश्या शब्दांच प्रस्थ फार वाढला आहे... मनोगताच्या माध्यमातून मी तरुण मुलांना हे सांगू इच्छिते की, घाणेरडे शब्द ( आई, बहीण व तत्सम नात्यांचा उद्धार करणारे) वापरू नका... तसेच नवरा बायकोच्या अतिसंवेदनशील नात्याला अश्या शिव्यांनी काळिमा फासू नका.....

कारण उद्या तुमचे सर्व घर या घाणेरडेपणामुळे उद्ध्वस्त होऊ शकते....