हेच खरे

काळजाशी फक्त त्यानी जोडले नाते खरे

जे तुला जमले न, दु:खाला कसे जमले बरे?
मी तुझ्या नजरेत आता वाळवंटे पाहतो
ते तुझ्या नजरेतले का आटले सारे झरे?
दूर तु गेलीस, जाताना जरा हसलीस तू
सांग कोणी हे सुखाचे कवडसे कैसे धरे?
ही अशी आमंत्रणे देतात का कोणी कधी?
शोधतो पत्ता, निशाणी, नांव अन सारी घरे...!
मी पुसोनी स्वच्छ केले माणसांची आरसे 
तो मला दिसलेच माझ्या चेहर्यावरचे चरे ...!