मतदानाच्या यादीमधुनी गायब राजा राणी -

"" मतदानाच्या यादीमधुनी गायब राजा राणी -"" 

(चाल- भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी)

मतदानाच्या यादीमधुनी गायब राजा राणी 

अर्ध्यावरती नाद सोडला मतदानावर पाणी ...
 नवरा वदला "मला ग नाही, नावाची ती आशा 
माझ्या नावापुढेच आहे 'मयत' खुणेची रेषा "
का भार्येच्या डोळा तेव्हा भरून आले पाणी ..... अर्ध्यावरती .....
भार्या वदली बघत एकएक यादीमधला फोटो 
"उद्या पहाते दुसऱ्या आपुल्या प्रभागात मी फोटो "
पण नवऱ्याला नव्हती खात्री दूर बसे जाऊनी .......अर्ध्यावरती....
तिला विचारी नवरा- 'का हे नाव असे खोडावे ?
आयोगाने पुसण्याआधी आम्हास का न पुसावे !'
भार्येला ना उत्तर सुचले, झाली केविलवाणी........अर्ध्यावरती ..
 का नवऱ्याने मिटले डोळे 'शाईखूण' दिसताना
 का नवऱ्याला त्रास वाटला मतदान ते बघताना
 बोटावरती नजर टाकितो अपुल्या उदासवाणी .......अर्ध्यावरती ....
दुवा क्र. १.
.