गमभनचा कीबोर्ड लेआऊट

युबंटू या प्रणालीमध्ये बोलनागरी कीबोर्ड पद्धतीने हिंदी / मराठी टाईप करता येते. पण मला तर मनोगत (गमभन) हाच कीबोर्ड अगदी सोयीचा वाटतो. बोलनागरीचा कीबोर्ड कसा चालतो ते येथे पाहता येईल.

दुवा क्र. १
 
माझा प्रश्न असा आहे की मनोगताच्या कळफलकाचा असा नकाशा कुठे उपलब्ध आहे का? मनोगतावर "टंकलेखन सहाय्य" या चित्रावर टिचकी मारली तर अकारविल्हे अक्षरे लावलेली दिसतात. मला कळफलकावर लावलेली अक्षरे (जशी वरील छायाचित्रात दिसतात तशी) मिळाली तर मला युबंटूसाठी गमभन पद्धतीचा कीबोर्ड सहज बनवता येईल.

दुवा क्र. २

वर दिलेल्या कोडमध्ये AD01 म्हणजे Q पासून सुरू होणारी सर्व बटणे, AC01 म्हणजे A पासून तर AB01 म्हणजे Z सुरू होणारी कीबोर्ड वरील बटणे. आता ती बटणे देवनागरी अक्षरांना कशी जोडतात ते पाहू.

key <AD03> { [ U0907, U0908 ] };

वरील ओळीचा अर्थ असा की कीबोर्डवरील e हे बटण युनिकोड यादीतील "इ" तर शिफ्ट E दीर्घ "ई" साठी वापरले जाते. आता गमभनमध्ये e आणि E साठी अनुक्रमे ए व अ‍ॅ आहे. (इ आणि ई आहे "I" या बटणावर) तेव्हा याची सवय असलेल्यांसाठी बोलनागरी कीबोर्डमध्येच काही सुधारणा करता येतील का?

गमभनचा कीबोर्ड लेआऊट मिळतो का कुठे ?