व्यापारास आले आणि राज्यकर्ते झाले

व्यापारास आले आणि राज्यकर्ते झाले


वा काय चपखल वर्णन आहे दोन संस्कृतींचे.
एक स्वयंचलित तर दुसरी प्रतिक्रीयतेमुळे काम करणारी.  असे का असावे कि भारताच्या बाहेरून आलेल्या लोकांना भरतीयांवर सहज राज्य करता येते. आणि त्यापुढे जाऊन महाराष्ट्राबाहेरून आलेले इतर भारतीय सुद्धा मराठी लोकांवर लिलया वर्चस्व गाजवू शकतात?


कारण स्थानीय लोक निष्क्रीय आहेत.  त्यांच्यात एकी नाही.  समाजाचे खंबीरपणे नेतृत्व करणार्‍या व्यक्ति त्यांच्यात नाहीत. 

याविरूद्ध ते बाहेरून आलेले लोक, मग ते बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, मारवाड, गुजराथ, तामिळनाडू, केरळ,  इकडून आलेले असोत किंवा अफगाणिस्थान, तुर्कस्थान, ईराण, पोर्तुगाल, फ़्रान्स, वा ईंग्लंड या देशांतून आलेले असोत.  त्यांच्यामध्ये धडाडी, जोखीम उचलायची प्रवृत्ति आणि नविन परिस्थिति आपल्याला अनुकूल करून घ्यायची मानसिकता आणि ती अमलांत आणण्याची पात्रता होती आणि आहे म्हणूनच ते लोक असे वर्चस्व गाजवू शकतात.


शिवसेनेचा पवित्रा अशा लोकांना काही काळ थोपवू शकेल, पण ते काही अंतिम उत्तर नव्हे.  खरे उत्तर आहे समाजोन्नति, समाजचिंतन.  सर्व थरातून आचेने समाज शिक्षण झाल्याखेरीज ही परिस्थिति बदलणे शक्य नाही.


कलोअ,


परभारतीय